♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

वनजमिनीवरील संघर्षातून आत्महत्येचा प्रयत्न; मोताळा तालुक्यातील अतिक्रमण प्रकरण चिघळले

MH 28 News Live / मोताळा : तालुक्यातील माळेगाव येथे वनजमिनीवरील अतिक्रमण हटवताना वनविभाग व आदिवासी अतिक्रमणधारक यांच्यात तीव्र संघर्ष उसळला. या घटनेत पोलीस, वन कर्मचारी आणि काही आदिवासी जखमी झाले असून परिसरात तणाव निर्माण झाला आहे.


या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ११ आरोपींसह १५ अज्ञातांवर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. यातील एक आरोपी भिमसिंग गायकवाड यांनी अटकेच्या भीतीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणामुळे वनजमिनीवरील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129