♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

कोयता गॅंगची स्टंटची रील करणे आले अंगलट… बुलढाण्यात पोलिसांच्या जाळ्यात दोन तरुण

MH 28 News Live / बुलढाणा : हातात लोखंडी कोयता घेऊन दुचाकीवर स्टाईलमध्ये फिरणाऱ्या दोन तरुणांनी तयार केलेली ‘रील’ सोशल मीडियावर टाकणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे. या थरारक स्टंटमागचा उद्देश काहीही असो, शहरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या प्रकाराची दखल बुलढाणा शहर पोलिसांच्या सोशल मीडिया सेलने घेतली आणि संबंधित तरुणांविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

या व्हिडिओमध्ये अमित बेंटवाल आणि आदित्य देशमुख हे दोघेही हातात लोखंडी कोयता घेऊन दुचाकीवर फिरताना दिसतात. त्यांनी हा व्हिडिओ ‘रील्स’ स्वरूपात तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केला होता. त्यातून धाकदपटशा करण्याचा उद्देश असावा, असा पोलिसांचा संशय आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हालचाल केली. व्हिडिओची बारकाईने छाननी करून आरोपींची ओळख पटवण्यात आली आणि दोघांना अटक करण्यात आली. अशा प्रकारचे दहशत निर्माण करणारे स्टंट करणाऱ्यांना कायद्यातून माफ नाही, हे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरप्रकार करणाऱ्यांवर लक्ष ठेवून भविष्यातही अशा प्रकारांना आळा घालण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129