♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

” फेसबुकची फ्रेंड रिक्वेस्ट का एक्सेप्ट केली नाही ?”… सोशल मीडियाच्या अवास्तव भानगडीत तरुणीचा विनयभंग

MH 28 News Live / शेगाव : तालुक्यातील एका गावात सोशल मीडियावरील फ्रेंड रिक्वेस्टला उत्तर न दिल्याच्या कारणावरून चक्क घरात शिरून २१ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. “माझी रिक्वेस्ट का स्वीकारली नाहीस?” असा जाब देत आरोपीने तरुणीचा हात पकडत गैरवर्तन केल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. पीडित तरुणी आपल्या घरात स्वयंपाक करत असताना आरोपी राहुल वासुदेव करांगळे हा कोणतीही पूर्वसूचना न देता थेट घरात घुसला. त्याने सोशल मीडियावर पाठवलेल्या रिक्वेस्टला उत्तर का दिलं नाहीस, असे विचारत तिच्याशी जबरदस्तीने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान रागाच्या भरात तिचा हात पकडत तिचा विनयभंग केला.

घाबरलेल्या तरुणीने तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात राहुल करांगळेवर भारतीय दंड संहितेच्या कलम ७४ आणि ३३३ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या संपर्काच्या विकृत परिणतीने महिलांच्या प्रत्यक्ष सुरक्षेवर गदा येत असल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. समाजमाध्यमातील आभासी संवाद आणि प्रत्यक्ष शारीरिक अतिक्रमण यामधील सीमारेषा पुसट होत चालल्याची धोक्याची घंटा या घटनेने वाजवली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129