
निबंध लेखनात चैतन्य गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची सरस कामगिरी
MH 28 News Live / चिखली : भगवान महावीर २५५० महानिर्वाण वर्षा निमित्त सप्टेंबर २०२४ मध्ये आयोजित भगवान महावीर यांच्या चरित्रावर आधारित निबंध स्पर्धेत चैतन्य गुरुकुल मधील विद्यार्थी अरिहंत बोरुंदीया (वर्ग ५ ते ७ गट ) याने दुसरा क्रमांक आणि कु.ऋतुजा सर्जेराव चेके ( वर्ग ८ते १० गट) हिने पाचवा क्रमांक मिळविला , गुरुवार दि. ३१ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित बक्षीस वितरण समारंभात या दोन्ही विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील आणि ललित गांधी (अध्यक्ष , जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य ) यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस देण्यात आले.

आजच्या पिढीने भगवान महावीरांचे विचार आचरणात आणण्याची आवश्यकता आहे असे विचार यावेळी बोलताना मा .जिल्हाधिकारी साहेबांनी आपले मत व्यक्त केले . चैतन्य गुरुकुल परिवाराकडून दोन्ही विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे .



