
किन्होळा येथील आई-मुलगी बेपत्ता
MH 28 News Live / चिखली : तालुक्यातील किन्होळा गावातून आई-मुलगी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गहिता सोनू उर्फ सपना पाटोळे (वय ३०) आणि तिची मुलगी कुमारी जागृती पाटोळे या ७ ऑगस्ट रोजी घरातून बाहेर पडल्या असून, त्यानंतर त्यांचा मागमूस लागलेला नाही.

या प्रकरणी नातेवाईकांनी चिखली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर चिखली पोलीस ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, पोलीस पथक बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध घेत आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास या घटनेबाबतची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, गहिता पाटोळे व तिची मुलगी यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ती तात्काळ चिखली पोलीस ठाण्यास कळवावी. दरम्यान, या घटनेमुळे किन्होळा परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.



