♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पेन टाकळी ‘ ओव्हर फ्लो नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

MH 28 News Live / मेहकर : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पेन टाकळी प्रकल्पासह नदी-नाल्यांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला पेन टाकळी प्रकल्प तुडुंब भरल्याने पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने काल तीन दरवाजे उघडले होते. याद्वारे सध्या ३४८८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

दरम्यान, आज सकाळी एक दरवाजा बंद करून दोन दरवाजांतून विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. वाढत्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पैनगंगा नदीकाठच्या सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच नागरिकांनी नदीपात्राजवळ न जाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, वरच्या भागातील पावसाचे पाणी प्रकल्पात वेगाने येत असल्याने पाणी विसर्ग आवश्यक आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असून, त्यानुसार विसर्गात बदल केला जाईल. प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129