♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

कर आकारणीत गैरप्रकार, आरोपी पाच दिवस पोलीस कोठडीत

MH 28 News Live / मलकापूर : मालमत्ताधारकांची कर आकारणीत फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी राहुल युवराज सम्राट या युवकाला अटक केली आहे. अमरावती येथील स्थापत्य कन्सल्टन्सी कंपनीत कार्यरत असलेल्या आरोपीने, कर कमी करून देण्याच्या आमिषाने गौरव खरे व पवन गिरी यांच्याकडून आर्थिक लाभ घेतल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी दाखल तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याला १४ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गैरप्रकारामुळे नगरपालिकेच्या कर आकारणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129