
दि. चिखली अर्बन विद्यानिकेतनचा खो-खो संघ महाराष्ट्रात अजिंक्य
MH 28 News Live / चिखली : सी.बी.एस.ई. संलग्नित दि. चिखली अर्बन विद्यानिकेतन शाळेचा खो-खो संघ मुंबई येथे झालेल्या सी.बी.एस.ई. द्वारे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत अजिंक्य ठरला असून रोमहर्षक कामगिरी करून राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
गुजरातमधील गांधीनगर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी दि. चिखली अर्बन विद्यानिकेतनच्या खो- खो संघाला या स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी या विजयामुळे प्राप्त झाली आहे.
सी.बी.एस.ई. द्वारे आयोजित या साखळी स्पर्धेत अंतिम सामना दिनांक बुधवार, दिनांक २० ऑगस्ट रोजी संपन्न झाला हा सामना नांदुरा येथील तुलसीबाई रंगलालजी झांबड आणि दि. चिखली अर्बन विद्यानिकेतन च्या दोन्ही संघात मध्ये झाला त्यामध्ये अत्यंत मोठ्या फरकाने म्हणजे १५ विरुद्ध २ च्या लढतीने दि. चिखली अर्बन विद्यानिकेतन चा संघ विजयी झाला असून संघातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून तेजस इंगळे, ऋषिकेश शिंदे आणि गणेश शिंदे यांना गौरविण्यात आले आहे.
या खो-खो संघाचे प्रशिक्षक प्रशिक्षक राजेंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परमानंद पवार यांचे सहकार्य विद्यार्थ्यांना लाभले. विशेष म्हणजे या संघात खेळणाऱ्या सर्वच खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे हे येथे उल्लेखनीय. खो-खो स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर शाळेचे विद्यार्थी गेल्याबद्दल शाळेचे अध्यक्ष सतिशजी गुप्त, सचिव डॉ. आशुतोष गुप्ता, शैक्षणिक संचालिका डॉ. सौ. पूजा गुप्ता, प्राचार्य गौरव शेटे यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विजयी संघाचे जल्लोषात स्वागत!
जेव्हा विजयी खो-खो संघ शाळेमध्ये पोहोचला त्यावेळेस शाळेमध्ये अत्यंत जल्लोषात फटाके पुष्पृष्टी तसेच ढोल ताशाच्या निनादात खेळाडूंचे भव्य स्वागत करण्यात आले व शाळेच्या परिसरातून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी आयोजित कार्यक्रमात खेळाडूंचा सत्कार करण्यात आला यावेळी खो-खो संघामधील खेळाडू तेजस इंगळे, मयूर लथाड, गणेश शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच संघाचे प्रशिक्षक राजेंद्र लोखंडे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी चिखली अर्बन विद्यानिकेतन चे सचिव
डॉ आशुतोष गुप्ता यांनी खेळाडूंचे कौतुक केले व राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मनोहर खडके, सहसचिव पुरुषोत्तम दिवटे, पालक संचालिका ज्योत्स्ना गुप्ता, संचालक राजेंद्र शेटे, संजय भंगीरे, शैक्षणिक संचालिका डॉ.पूजा गुप्ता तसेच चिखली अर्बन बँकेचे सरव्यवस्थापक शशांक पंधाडे, सुषमा शेटे शाळेचे प्राचार्य गौरव शेटे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण पाटील यांनी केले.