♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

हरणी गाव हादरलं! जुन्या वैमनस्यातून गजानन पवार यांची दगडाने निघृण हत्या

MH 28 News Live / चिखली : तालुक्यातील हरणी गावात बुधवारी रात्री घडलेल्या खूनाच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जुन्या वैमनस्यातून गजानन बारकू पवार (वय ५५) यांची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना २७ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.

प्राथमिक माहितीनुसार, पवार आणि गावातील शिवराम कुसळकर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादातूनच कुसळकर याने गजानन पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यात पवार गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

गावकऱ्यांनी तत्काळ पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान, आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. या रक्तरंजित घटनेनंतर हरणी गावात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या शांततेत घडलेल्या या खुनामुळे ग्रामस्थ हदरले असून गावात चर्चेचा विषय ठरला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129