
शालेय क्रिडा स्पर्धेत चैतन्य गुरुकुलची उल्लेखनीय कामगिरी
MH 28 News Live / चिखली : चैतन्य गुरुकुल शाळेतील विद्यार्थ्यांनी अलीकडे झालेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत शाळेचा लौकिक वाढविला आहे.
हॉलीबॉल मध्ये विभाग स्तरावर जिंकून वर्ल्ड स्कूल चॅम्पियनशिपसाठी शाळेतील कु. सृष्टी रिंढे हिची राज्याच्या संघामध्ये निवड झाली आहे. ॲथलेटिक असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये सुमित भुसारी याने विभाग स्तरावर ६०० मी धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक तसेच लांब उडी मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तालुका स्तरावर झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्ता आणि एकाग्रतेच्या जोरावर विजेतेपद पटकावले. कु.तनुश्री पानगोळे, प्रणय नागरे , पार्थ जोगदंडे ,राजविर वायाळ आणि शंतनू शेळके हे यांची जिल्हा स्तरावर खेळण्यासाठी निवड झाली आहे.
नुकत्याच झालेल्या तालुका स्तरीत हॉलीबॉल स्पर्धेत १४ वर्षाखालील तसेच १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने दणदणीत विजय मिळवत जिल्हास्तरासाठी पात्रता सिद्ध केली आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम असल्याने चैतन्य गुरुकुल शाळेच्या क्रीडा परंपरेला नवी दिशा मिळाली आहे. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून शाळेचे विद्यार्थी विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही आपल्या कामगिरीचा ठसा उमटवून येतील अशा विश्वास चैतन्य गुरुकुल परिवाराने व्यक्त केला आहे.