♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते फुटली; शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले

MH 28 News Live / बुलढाणा : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीची मते फुटल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला असला, तरी ( NCP Sharad Pawar  ) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे यांनी तो फेटाळून लावला आहे. “आमची मते फुटलेली नाहीत, महाविकास आघाडीतही मतफुटीचा प्रश्न नाही,” असा ठाम दावा त्यांनी बुलढाण्यात पत्रकार परिषदेत केला.

मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात विचारणा झाल्यावर आमदार शिंदे यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका केली. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर जो अध्यादेश काढण्यात आला तो मंत्रिमंडळाचा सामूहिक निर्णय आहे. मग त्याच मंत्रिमंडळातील काही नेते उघड नाराजी का व्यक्त करतात? सरकारमधील काहीजण वेगवेगळ्या भूमिका घेत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे,” असे ते म्हणाले.

मराठा आरक्षणाचा निर्णय महायुती सरकारने घेतला असून त्याची जबाबदारीदेखील त्यांचीच असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. “सरकार दोन समाजात फूट पाडून राजकीय फायदा घ्यायच्या प्रयत्नात आहे. मराठा आणि ओबीसी समाज वेगवेगळ्या पद्धतीने हाताळून राजकारणाचा फायदा घेतला जात आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एका आयपीएस अधिकाऱ्याच्या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्थन दिल्याच्या चर्चेबाबत विचारले असता, शशिकांत शिंदे यांनी हे स्पष्ट शब्दांत नाकारले. “रोहित पवार यांनी केवळ मत व्यक्त केले, त्यातून अजित पवार यांना समर्थन केल्याचा प्रश्नच नाही,” असे त्यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेला माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष व माजी आमदार रेखाताई खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129