♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

परतीच्या पावसाचा जिल्ह्यात धुमाकूळ; खडकपूर्णा व पेनटाकळी प्रकल्पांचे दरवाजे उघडे; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

MH 28 News Live / बुलडाणा : जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, हवामान खात्याच्या अंदाजानुसार गेल्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली आहे. यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले असून, वाढत्या जलसाठ्याला आळा घालण्यासाठी प्रशासनाने धरणांचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पाचे १९ दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडण्यात आले असून, यामधून दर सेकंदाला तब्बल ४६,८५४ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्याचबरोबर मेहकर तालुक्यातील पैनगंगा नदीवरील पेनटाकळी प्रकल्पाचे ५ दरवाजे २० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. हा निर्णय आज, १६ सप्टेंबर रोजी सकाळी घेण्यात आला.

दरवाजे उघडल्यामुळे खडकपूर्णा व पैनगंगा नदीच्या काठावरील गावांमध्ये पाणीपातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्राजवळ जाणे टाळावे, शेतकरी व मच्छीमारांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

सध्या जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची परिस्थिती कायम असल्याने धरणातील जलसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत परिस्थितीनुसार अधिक दरवाजे उघडले जाऊ शकतात, असे जलसंपदा विभागाने नमूद केले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहनही अधिकाऱ्यांनी केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129