♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

प्रेमप्रकरणाचा खूनी शेवट; आधारकार्डचा गैरवापर आला उघडकीस, लॉजिंगवर पोलीसांची करडी कमान

MH 28 News Live / खामगाव : शहरातील हॉटेल जुगुनू येथे घडलेल्या थरारक घटनेने परिसरात एकच खळबळ उडवली आहे. २३ सप्टेंबरला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास साहिल दीपसिंग राजपूत (२३) आणि शिंदी येथील ऋतुजा पद्माकर खरात (२२) हे प्रेमी युगुल येथे दाखल झाले. “आम्ही खूप थकलो आहोत, लवकर खोली द्या” असे सांगून त्यांनी १०४ क्रमांकाची खोली घेतली. परंतु केवळ अर्ध्या तासातच साहिलने ऋतुजाचा गळा दाबून खून केला आणि स्वतःच्या आयुष्याचाही अंत केला. या दुहेरी मृत्यूमुळे खामगाव शहरात भीती आणि हळहळ पसरली आहे.

आधारकार्ड गैरवापर आणि चौकशी

घटनेच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. युगुलाने स्वतःची ओळख न दर्शविता नातेवाईक व मैत्रिणींची आधार कार्डे वापरून खोली बुक केली होती. इतकेच नव्हे, तर मृत युवतीने यापूर्वीही इतरांच्या नावाने आठ वेळा लॉजमध्ये खोल्या घेतल्याचा खुलासा झाला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी जुगुनू हॉटेलचे रजिस्टर जप्त केले असून परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. खामगाव-शेगाव परिसरातील लॉजेसची तपासणी वेगाने सुरू असून, बनावट आधार कार्डांवर सहज होणारे बुकिंग ही गंभीर सुरक्षा त्रुटी असल्याने कठोर कारवाई होणार, अशी शक्यता आहे.

👉 ही घटना केवळ प्रेमसंबंधातील दुर्दैवी शेवट नाही, तर लॉजिंग व्यवसायातील निष्काळजीपणाही उघड करणारी ठरली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129