♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मलकापूरमध्ये अवैध बायोडिझेल पंपांवर कारवाई; पाच लाखांहून अधिक माल जप्त

MH 28 News Live / मलकापूर : येथे २७ सप्टेंबर रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखा व महसूल विभागाच्या पथकाने संयुक्त धाडसत्र राबवून अवैध बायोडिझेल पंपांवर मोठी कारवाई केली. राष्ट्रीय महामार्गालगत दोन ठिकाणी बेकायदेशीररीत्या विक्री होत असलेला डिझेलसदृश पेट्रोलियम पदार्थ या कारवाईत जप्त करण्यात आला. या धाडीत ५ लाख ८६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर अवैध पंपांवर कोणताही शासकीय परवाना अथवा परवानगीपत्र नसताना बेकायदेशीररीत्या विक्री सुरू असल्याचे आढळून आले.

याप्रकरणी मलकापूर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे. या बेकायदेशीर व्यवसायामागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे का, याचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.

दरम्यान, या कारवाईनंतर परिसरातील इतर भागातही अशा प्रकारचे अवैध पंप सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून पुढील काळात आणखी धाडसत्रे राबवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी या धाडसत्राचे स्वागत करत अवैध बायोडिझेल विक्रीवर कायमस्वरूपी आळा बसावा, अशी मागणी केली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129