♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ओल्या दुष्काळाच्या छायेत शेतमजुराची आत्महत्या; विष प्राशन करून संपवले जीवन

MH 28 News Live / नांदुरा : जिल्ह्यात सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या ओल्या दुष्काळाच्या परिस्थितीने शेतकऱ्यांसह शेतमजुरांचेही जीवन उध्वस्त होऊ लागले आहे. शेतीवर उपजीविका अवलंबून असलेल्या मजुरांवर आर्थिक संकट कोसळल्याने त्यांचे दैनंदिन जगणे अधिकच कठीण झाले आहे. या नैराश्यपूर्ण वातावरणाचे भयावह चित्र गोशिंग तांडा (ता. नांदुरा) येथील ३५ वर्षीय शेतमजूर शिवलाल छगन शिंदे यांच्या मृत्यूमुळे प्रकर्षाने समोर आले.

३० सप्टेंबर रोजी स्थानिक शेतकरी यशवंतराव सावंत यांच्या शेतात फवारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर शिवलाल यांनी शेतातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा मार्ग निवडला. तत्काळ त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान बुधवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला.

शेतकऱ्यांवर कोसळलेल्या अस्मानी संकटासोबतच शेतमजुरांचेही जगणे किती बिकट झाले आहे याचे हे वास्तव उदाहरण ठरले आहे. मजुरांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता अधिक तीव्रतेने पुढे येत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129