
फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणावर चिखलीत गुन्हा दाखल
MH 28 News Live, चिखली : रामनवमीचा उत्सव परवा जिल्ह्यात सर्वत्र शांततेत पार पाडला. मात्र चिखली येथील एका युवकाने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे संबंधित युवकावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, चिखली शहरातील जुने गाव परिसरातील बारभाई मोहल्ला येथे राहणाऱ्या साहिल हुसेन शेख इसार या युवकाने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. या पोस्टमुळे धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार आकाश गुलाबराव लोखंडे यांनी चिखली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. सदर तक्रारीवरून चिखली पोलिसांनी साहिल हूसेन शेख इसार या युवकावर आयपीसी १५३, ५५५ ( २ ), आणि माहिती अधिकार कायदा कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.



