
चिखलीत बोलेरो पिकअपचा अपघात – सुदैवाने जीवितहानी टळली! स्थानिक नागरिकांनी दाखवली तत्परता, प्रवाशांना दिला मदतीचा हात
MH 28 News Live / चिखली : हैदराबादहून पहूर, जळगावकडे मासे घेऊन जाणारे बोलेरो पिकअप वाहन आज सकाळी चिखलीच्या खामगाव नाक्यावर उलटले. अनियंत्रित झालेल्या या वाहनात माशांचा मोठा साठा भरलेला होता. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

वाहनचालक आणि इतर प्रवासी सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर परिसरातील नागरिक आणि वाटसरू तात्काळ घटनास्थळी धावून आले. त्यांनी वाहनातील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले तसेच रस्त्यावर पडलेला माल आणि मलबा हटवून वाहतूक सुरळीत करण्यात मदत केली.
स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे मोठा अनर्थ टळला. अपघाताची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे.



