♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

प्राचार्य निलेश गावंडे यांना बळ देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या चिखलीत.  परिवर्तन सभेचे राजा टॉवर जवळ आयोजन

MH 28 News Live / चिखली : चिखली नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस–शिवसेना युतीने आपल्या प्रचाराला जोरकस वेग दिला असून नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्राचार्य डॉ. निलेश गावंडे आणि प्रभागातील सर्व उमेदवारांच्या समर्थनार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या, दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी चिखलीत दाखल होत आहेत. शहरातील राजा टॉवरच्या प्रांगणात आयोजित या परिवर्तन सभेत अजितदादा पवार महायुतीच्या या उमेदवारांना थेट जनतेसमोर पाठबळ देणार आहेत. या सभेला दोन्ही पक्षांचे वरिष्ठ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चिखली नगरपालिकेची निवडणूक प्रचंड गांभीर्याने हातात घेतली असून संघटनात्मक तयारी पूर्ण क्षमतेने सुरू आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळाला शिवसेनेच्या धनुष्यबाणाची साथ मिळाल्याने या युतीची ताकद बहुगुणित झाली आहे. या बळावर आणि प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांसारख्या उच्चशिक्षित, सुसंस्कृत, सामाजिक भान असलेल्या उमेदवारामुळे युतीने भाजपा आणि काँग्रेस या प्रस्थापित पक्षांसमोर भक्कम आव्हान उभे केले आहे. गावंडे यांचा व्यापक जनसंपर्क, सामाजिक कार्यातील सातत्य आणि नेतृत्वगुण या निवडणुकीत निर्णायक ठरतील, असे निरीक्षण राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

प्राचार्य निलेश गावंडेंवर जनतेचा विश्वास

शिक्षण, समाजकार्य आणि राजकारणात दमदार ओळख निर्माण केलेल्या प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांच्या उमेदवारीने चिखलीकरांच्या अपेक्षांना नवे पंख लाभले आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे आधीच चिंताग्रस्त झालेल्या प्रतिस्पर्ध्यांना उद्याची सभा आणखी घाम फोडणारी ठरणार आहे. स्पष्टवक्ते, थेट शैलीत भाषण करणारे आणि विकासाची सरळ दिशा दाखवणारे म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार उद्या चिखलीच्या जाहीर सभेतून “शहर विकासाची धुरा गावंडे यांच्या खांद्यावर सोपवा” असा थेट संदेश देणार असल्याची चर्चा मतदारांत रंगली आहे. त्यामुळे युतीच्या उमेदवारांचे पारडे सभेनंतर आणखी जड होईल, असा विश्वास मतदार वर्गातून व्यक्त केला जात आहे.

अजितदादांची  परिवर्तन सभा; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

प्राचार्य निलेश गावंडे आणि युतीच्या सर्व प्रभागातील उमेदवारांना विजयाच्या दिशेने नेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता राजा टॉवरच्या मैदानात त्यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे जिल्हा व शहर स्तरावरील पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, तसेच प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांच्यावर प्रेम करणारे हजारो नागरिक उपस्थित राहणार आहेत. मतदारांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहून युतीच्या उमेदवारांना सक्षम पाठिंबा द्यावा, असे आवाहन दोन्ही पक्षांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129