
चिखलीच्या सर्वांगीण विकासासाठी प्राचार्य निलेश गावंडे यांना विजयी करा – आ. सना मलिक शेख ना. माणिकराव कोकाटे यांनी दिली अल्पसंख्याकांच्या समस्या सोडवण्याची ग्वाही
MH 28 News Live / चिखली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष मूल्यांची जपणूक करणारा व शिव, शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा मानणारा पक्ष आहे. या पक्षामध्ये कुठलाही जातीय व धार्मिक भेदभाव केला जात नाही तसेच समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी अजितदादा पवार व संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने प्रयत्नशील असतो. याच राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राचार्य डॉ. निलेश गावंडे हे देखील एक सर्वसमावेशक व्यक्तिमत्व आहे. कुठलाही धार्मिक भेदभाव न करणाऱ्या व अल्पसंख्यांक समाजाला सोबत घेऊन चिखली शहराचा सर्वांगीण विकास करणाऱ्या प्राचार्य निलेश गावंडे यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक शेख यांनी केले. दि. २८ नोव्हेंबर रोजी झालेल्या प्रचार सभेत त्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील प्राचार्य निलेश गावंडे यांना नगराध्यक्षपदी विराजमान करा; शहरातील अल्पसंख्याकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील राहू अशी ग्वाही उपस्थित त्यांना दिली.

चिखली नगरपरिषद निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस – शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून प्राचार्य डॉ. निलेश गावंडे हे मैदानात उतरले आहेत. त्यांना सर्व धर्मीय मतदारांकडून व्यापक प्रतिसाद मिळत आहे. प्राचार्य गावंडे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार सना मलिक व राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री माणिकराव कोकाटे यांची जाहीर सभा २८ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे, तालुकाध्यक्ष संतोष परिहार, मीनल गावंडे, राजू गवई, दत्ता खरात, तुषार बोंद्रे, सुभाष देवडे, संतोष लोखंडे, डॉ नितीन पाटील, राजू रज्जाक, करामत भाई, रिकी काकडे, शेखर बोंद्रे, व्यंकटेश बोंद्रे, दिलीप मेहेत्रे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मी सुरुवातीपासूनच सेक्युलर विचारधारा मानणारा कार्यकर्ता म्हणून काम करत आलो आहे. हिंदू – मुस्लिम असा कुठलाही भेदभाव मी आयुष्यात कधीच केला नाही. समाजातील प्रत्येक जाती-धर्माच्या व्यक्तीचा विकास हेच माझे नेहमी ध्येय राहिले आहे. या ध्येयाच्या पूर्ततेसाठी मी निवडणुकीमध्ये उतरलो असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मला मिळावी व या माध्यमातून सर्व समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेतून आपण काम करत असल्याचे प्राचार्य निलेश गावंडे यावेळी म्हणाले. चिखली शहरातील शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मतदारांनी मला संधी द्यावी असे आवाहन प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांनी यावेळी बोलताना केले.
आमदार सना मलिक शेख व नामदार माणिकराव गावंडे यांचे विचार ऐकण्यासाठी या सभेला अल्पसंख्यांक मुस्लिम समाजातील महिला व पुरुष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



