
भिकू लोळगे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान सुवर्ण भरारी सेवाभावी संस्थेतर्फे झाला गौरव
MH 28 News Live / चिखली : मागील अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असलेले सकाळचे बातमीदार भिकू लोळगे यांना नाशिक येथील सुवर्ण भरारी सेवाभावी संस्थेच्या वतीने उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. दि ७ डिसेंबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरानगर लोणी येथे झालेल्या समारंभात लोळगे यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

चिखली तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष असलेले भिकू लोळगे पत्रकारिता क्षेत्रामध्ये मागील १५ वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सुवर्ण भरारी सेवाभावी संस्थेने उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी त्यांची निवड केली. संस्थेच्या अध्यक्षा डॉ सारिकाताई नागरे , श्री श्री १००८ महामंडलेश्वर दत्तात्रय दहिवाळ महाराज व अन्य मान्यवरांच्या हस्ते लोळगे यांना हा पुरस्कार समारंभ पूर्वक देण्यात आला. मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याची पावती लोळगे यांना पुरस्काराच्या स्वरूपात मिळाल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



