
विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना रोल मॉडेल म्हणून पाहावे – पोलीस अधीक्षक निलेश तांबे चैतन्य गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व सोशल मीडिया अवेअरनेसवर मार्गदर्शन
MH 28 News Live / चिखली : विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात पालकांना रोल मॉडेल म्हणून स्वीकारावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले. चैतन्य गुरुकुल चिखली या शाळेत आयोजित सायबर सुरक्षा, सोशल मीडिया अवेअरनेस व अभ्यासविषयक मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा, सोशल मीडियाचा सुज्ञ वापर तसेच अभ्यासातील शिस्त याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शाळेने जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे व त्यांच्या सर्व टीमच्या वतीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे, पोलीस निरीक्षक संग्राम पाटील, प्रमोद इंगळे, राजदीप वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली , कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री राजेंद्र व्यास होते यावेळी पोलीस अधीक्षकांच्या संपूर्ण टीमने विद्यार्थ्यांना मनोरंजक पथनाट्य सादरीकरणातून सायबर गुन्ह्यांचे प्रकार, ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडियावर घ्यावयाची काळजी, गोपनीयतेचे महत्त्व तसेच मोबाईल व इंटरनेटचा योग्य वापर याबाबत सविस्तर व सोप्या शब्दांत मार्गदर्शन केले.
अभ्यासासोबतच शिस्त, वेळेचे नियोजन व सकारात्मक विचारसरणी यांचा अवलंब केल्यास विद्यार्थी यशस्वी नागरिक घडू शकतात, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत सजगता वाढण्यास मदत होईल, असे तांबे यांनी केलेल्या अमूल्य मार्गदर्शनाने विद्यार्थी व पालक वर्गात डिजिटल धोक्यांपासून वाचणे , विद्यार्थ्यांचा सोशल मीडियाचा वापर नक्कीच कमी आणि उपयोगाचा होईल असा विश्वास शाळा प्रशासनाने व्यक्त केला. कार्यक्रमास शाळेचे संचालक, प्राचार्य,व शिक्षकवर्ग, पालक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.



