♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कारांसाठी ग्रंथालय भारतीचे आवाहन

ग्रंथालय भारतीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रंथपाल, कार्यकर्ता आणि ग्रंथालयांना पुरस्कार देण्यात येत होते. मात्र काही काळ तांत्रिक कारणांमुळे पुरस्कार वितरण थांबले होते. आता ही योजना पुनश्च सुरू करण्यात येत असून, सार्वजनिक ग्रंथालय चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या घटकांना सन्मानित करण्याचा उद्देश यामागे आहे.

वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी ग्रंथालये, ग्रंथपाल आणि कार्यकर्त्यांकडून सातत्याने केले जाणारे प्रयत्न समाजासाठी महत्त्वाचे असून, अशा कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरस्कार दिले जाणार आहेत. यासाठी संबंधित सार्वजनिक ग्रंथालयांनी आपल्या ग्रंथपाल, कार्यकर्ता तसेच ग्रंथालयाच्या वतीने पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुरस्कारासाठीचे प्रस्ताव सोबत दिलेल्या नमुना अर्जामध्ये भरून दिनांक १५ जानेवारी २०२६ पर्यंत पाठवावेत, असेही कळविण्यात आले आहे. हे पुरस्कार मार्च २०२६ मध्ये नागपूर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.

पुरस्कार अर्ज पाठविण्याचा पत्ता असा आहे :
श्री सुनील एकनाथजी वायाळ,
केंद्रीय कार्यवाह, ग्रंथालय भारती,
जय श्रीराम, सरस्वती नगर, चिखली,
मु.पो.ता. चिखली, जि. बुलढाणा – ४४३२०१.
भ्रमणध्वनी : ९७६३० ८९८३७.

सार्वजनिक ग्रंथालय चळवळीला बळ देण्यासाठी आणि वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी या पुरस्कार योजनेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन ग्रंथालय भारतीच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाने केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129