♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

काका निघाला रक्तपिपासू ! किरकोळ वादातून पुतण्याची निर्घृण हत्या, दोन तासांत आरोपी जेरबंद

MH 28 News Live / हातनी (ता. चिखली) : ‘काका’ हा शब्द मायेचा, विश्वासाचा… मात्र हातनी गावात याच नात्याला रक्ताचे गालबोट लागले. एकाच घरात राहणाऱ्या काका-पुतण्यात किरकोळ वादातून थेट हत्या झाली आणि संपूर्ण गाव हादरून गेले. काल रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास काका विनोद रामचंद्र जाधव उर्फ ‘मंत्री’ याने स्वतःच्या पुतण्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली.

मृतक गोपाल अजबराव जाधव (वय २४, रा. हातनी) हा घरी असताना काका विनोद जाधव याच्याशी क्षुल्लक कारणावरून वाद झाला. क्षणातच हा वाद टोकाला गेला. संतापाच्या भरात काकाने कुन्हाडीच्या मागच्या भागाने गोपालच्या डोक्यावर आणि छातीत जोरदार वार केले. रक्ताच्या थारोळ्यात गोपाल जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. घराच्या चार भिंतींत घडलेली ही क्रूर हत्या पाहून परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ चिखली पोलिसांना कळवले. मात्र पोलिस येत असल्याची चाहूल लागताच आरोपी ‘मंत्री’ अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला. तो मक्याच्या शेतात लपून बसल्याचे पुढे समोर आले. चिखली पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत अवघ्या दोन तासांत आरोपीला शेतातून ताब्यात घेतले.

ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे, पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर, नितीनसिंग चव्हाण, विजय किटे, बिट जमदार अनिल वाघ, डी.बी. पथकाचे अमोल गवई, प्रशांत धंदर, राहुल पायघन, अजय इटावा, अमोल इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत. काका-पुतण्याच्या नात्यातील या रक्तरंजित घटनेने हातनी गावात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129