♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बेराळा फाट्यावर दुर्दैवी अपघात; दुचाकीस्वार ठार, पत्नी गंभीर

MH 28 News Live / चिखली : खामगाव–जालना महामार्गावरील बेराळा फाटा येथे आज सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. भरधाव एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

मृत व्यक्तींची ओळख संजय पांडुरंग गायकवाड (वय ५८, रा. केळवद, ता. चिखली) अशी असून त्यांची पत्नी शिला संजय गायकवाड (वय ५०) जखमी झाल्या आहेत. दोघेही केळवदहून जाभोरा येथे देवदर्शनासाठी दुचाकीवरून जात असताना बेराळा फाटा परिसरात संभाजीनगर ते हिंघणघाट मार्गावर धावणाऱ्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

अपघाताचा धक्का इतका तीव्र होता की संजय गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून स्थानिक नागरिकांनी तत्परतेने मदतकार्य सुरू केले. जखमी शिला गायकवाड यांना तातडीने चिखली येथील जवंजाळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून या घटनेमुळे केळवद परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताबाबत पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129