
बुलडाण्याजलळच्या येळगावातून ५९ वर्षीय वृद्ध बेपत्ता
MH 28 News Live, बुलडाणा : तालुक्यातील येळगाव येथील ५९ वर्षीय वृध्द बेपत्ता झाला आहे. ही घटना काल, २४ मार्चला सकाळी आठच्या सुमारास समोर आली. दिलीप त्र्यंबक खंडागळे असे या वृध्दाचे नाव आहे. त्यांचा मुलगा नीलेश यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात ते हरवल्याची तक्रार दिली.
दिलीप खंडागळे सकाळी आठला कामावर गेले होते. त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. परिसरात व नातेवाइकांकडे शोध घेऊनही ते मिळून आले नाहीत. त्यामुळे आज २५ मार्चला त्यांनी वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. तपास पोहेकाँ दत्तात्रय नागरे करत आहेत. रंग काळा-सावळा, उंची ५ फूट ३ इंच, अंगात पांढरी बनियान, निळसर पॅन्ट, सडपातळ बांधा अशा वर्णनाची व्यक्ती कुठे आढळल्यास पोलिसांना कळविण्यात आवाहन करण्यात आले आहे.



