♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

MH 28 News Live, चिखली : स्थानिक अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित केलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा सन् २०२०-२०२१ . मध्ये शाळेतील प्राथमिक विभागातील विद्यार्थीनी कु. आकांक्षा खेडेकर आणि कु. श्रावणी काकडे या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन, शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या आहेत. तसेच माध्यमिक वर्गातील कु. अमृता देशमुख, आणि कु. प्राजक्ता पसारकर या विद्यार्थीनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन त्या शिष्यवृत्ती योजनेस पात्र झालेल्या आहेत.अनुराधा स्कूलचे १०० विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट झाले होते यामध्ये ५० विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत. व या विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. सदर विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे; तसेच त्यांच्या या यशाचे श्रेय त्यांचे शिक्षक वृंद पालक यांना दिले जात आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश मिळाल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा ॲडवोकेट वृषालीताई बोंद्रे व प्राचार्या नन्हई मॅडम व मार्गदर्शक सल्लागार सुजाता कुल्ली मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले,व सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129