
महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर जयंती धामणगाव बढे येथे साजरी
MH 28 News Live, धामणगाव बढे : महात्मा ज्योतिबा फुले व डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती फुले शाहु आंबेडकर विचार मंच व माळी समाज बहुउद्देशीय विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या अंतर्गत दि. ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रतिमेची मोठ्या उत्साहात भव्य मिरवणुक काढण्यात आली तर दि. १४ एप्रिल रोजी विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती दिनाचे कार्यक्रमानुसार धामणगाव बढे येथील नालंदा बुध्द विहारात सकाळी ८ वाजता पंचशिल ध्वजारोहण तर ८-३० वा. त्रिशरण पंचशील ९ वाजता मान्यवरांचे मौलीक मार्गदर्शन तर सायंकाळी ४-३० वाजता नालंदा बुध्द विहारापासुन महात्मा ज्योतिबा फुले व डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.
या प्रसंगी सर्व धर्मियांनी सहभागी होत सर्वधर्म समभाव व एकता अखंडतेच प्रदर्शन केले. ढोल ताश्याच्या गजरात ” एकच साहेब बाबासाहेब “, ” जयभीम..। जयभीम ” च्या घोषणेने परिसर दुमदुमुन गेला. या निळ्या वादळाने व जय भीमाच्या गर्जनेने भीममय वातावरण झाले होते. जल्लोशात हजारो अनुयायी सळसळत्या उत्साहात लहान थोर महिला पुरुष भीममय झाले होते.
संपुर्ण गावातून शांततापूर्ण महामानवांचे प्रतिमेची मिरवणुक निघुन नालंदा बुध्द विहाराचे प्रांगणात विसर्जित करुन उपस्थित मान्यवरांचे आयोजकांच्या वतिने आभार व्यक्त केले.



