आ. अमोल मिटकरी विरोधात मेहकरात ब्राह्मण संघाचे निवेदन
MH 28 News Live, मेहकर : आ. अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदू समाजाच्या परंपरा, मंत्रोच्चार याबाबत अपशब्द वापरून भावना दुखविल्या बद्दल येथील ब्राह्मण समाजाने आज उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले की रा. काँ. चे विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदू समाजाच्या चालिरीती व ब्राह्मण पुरोहितांचे मंत्रोच्चार याबाबतीत टिंगल टवाळी करून कन्यादान संदर्भात मम भार्या समर्पयामि हा चुकीचा मंत्र तयार केला व बोलून दाखवला. यामुळे हिंदू समाज व पुरोहित बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे सुध्दा सभेला उपस्थित होते. तेव्हा आ. अमोल मिटकरी यांचा राजीनामा घ्यावा निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे केली आहे. निवेदन देते वेळी भगवान परशुराम प्रतिष्ठान अध्यक्ष जयदीप दलाल, माजी नगरसेवक विकास जोशी, अरूण भिते, शेखर राजे, समीर मोहरील, आनंद शर्मा, किरण जोशी, जयदेव पितळे, निलेश बावने, प्रदीप जोशी, मनीष जोशी, अरविंद जोशी, अनिल जोशी, विक्रम जोशी, विनायक जोशी, संदीप तट्टे, सुमंत जोशी, गौरी दलाल, साधना पिंपरकर, श्रीमती रंजना पिंपरकर, सौ. अनघा केतकर, श्रीमती संध्या कोरान्ने, मंजिरी राजदेरकर, अनघा राजदेरकर, सुरेखा जोशी आदी उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button