
डोणगांव येथे माळी महासंघाची बैठक. बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी निंबाजी पांडव
MH 28 News Live, डोणगांव : येथे बुलडाणा जिल्हा माळी महासंघाची विस्तृत बैठक माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे यांच्या उपस्थितीत गुरुवारी पार पडली. या बैठकीत सामाजिक कार्य, ओ. बी. सी. आरक्षणाबाबत चर्चा करुन जिल्हा कार्यकारिणी बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी बुलडाणा जिल्हाध्यक्ष पदी मेहकर पंचायत समितीचे माजी सभापती निंबाजी पांडव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना नियुक्ती पत्र देऊन जिल्हा कार्यकारणी गठीत करण्याचे सांगून संपुर्ण महाराष्ट्रात 11 मे पासून माळी महासंघ संघटन दौरा निघणार असुन यामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष निंबाजी पांडव यांनी केले.
यावेळी डोणगांव येथील माळी महासंघाचे अशोक पांडव, ग्रामपंचायत सदस्य रवी पांडव गणेश पांडव, विजय जाग्रृत, प्रकाश मानवतकर, माजी विस्तार अधिकारी सखाराम पाद्रे यांच्यासह बहुसंख्य माळी समाज बांधव उपस्थित होते. नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष निंबाजी पांडव यांचा प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे यांनी सत्कार केला.