
” महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खूपसला ” – राजू शेट्टी यांनी हूंकार यात्रेत डोणगावमध्ये केला आरोप
MH 28 News Live, मेहकर : राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खूपसला असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. पक्षाने काढलेली हूंकार यात्रा आज डोणगावमध्ये पोहचली. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.
डोणगाव येथे दि. 30 एप्रिल रोजी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच बळीराजा यांची हुंकार यात्रा संपन्न झाली. यावेळी खासदार राजू शेट्टी यांची डोणगाव नगरीत आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत यांचे स्वागत करण्यात आले.या हुंकार यात्रेमध्ये देशाचा कष्टकरी बळीराजा यांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. तसेच महाविकास आघाडी सरकारवर टांगती तलवार ठेवण्यात आली. महाविकास आघाडी सत्तेवर आहे या सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, शेतकऱ्यांच्या दृष्टीने कोणती कामे या सरकारने केले नसून सोयाबीन व इतर शेतमालाच्या भावाची बाबत कुठलाही प्रयत्न सरकारने केला नाही. शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा भेटला नाही, तसेच कुठल्याही प्रकारची दुष्काळी मदत शेतकरी वर्गापर्यंत पोहोचली नाही अशा विविध प्रश्नांवर चर्चा करून सरकारवर अंकुश ठेवण्यात आला. या हुंकार यात्रेमध्ये हजारो शेतकरी व सर्व कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले की, 1 मे ला प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये स्वाभिमानी कायदा आमलात आणण्यासाठी ग्रामसभेमध्ये नागरिकांनी ठराव घेऊन बुलढाणा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले स्वाभिमानी हेल्पलाइन सेंटर डोणगाव येथे जमा करावा असे आवाहन यावेळी त्यांनी केली.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button