अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला होणार आता 23 मेपासून सुरुवात
MH 28 News Live : अकरावी ऑनलाइन प्रवेशाला सुरुवातीलाच ब्रेक लागला आहे. 17 मेपासून अकरावी ऑनलाइन प्रवेशाचा सराव अर्ज भरता येणार होता, पण आता 23 मेपासून सराव अर्ज भरता येणार आहे. याबाबतचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱया ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा विद्यार्थ्यांना सराव व्हावा यासाठी अर्जाचा पहिला भाग भरण्याची प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र त्यात बदल करण्यात आला आहे. अर्ज भरण्याचा सराव झाल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवडय़ात अर्जाचा भाग एक भरता येणार असून 20 जूननंतर दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर अर्जाचा दुसरा भाग म्हणजेच कॉलेज पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील ज्युनियर कॉलेजांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवडय़ात जाहीर होईल, अशी शक्यता असल्याने 17 मेपासून सराव अर्ज भरण्याला सुरुवात होणार होती, पण आता दहावीचा निकाल 20 जूनदरम्यान जाहीर होणार असल्याने अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
अकरावी प्रवेशाचा अर्ज कसा भरावा यासाठी https://11thadmission.org.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना सराव अर्ज 23 मेपासून भरता येणार आहे. या दिवशीच प्रवेशासाठीचे कॉल सेंटरदेखील सुरू करण्यात येणार आहेत. अर्ज भरताना काही अडचणी आल्यास विद्यार्थी कॉल सेंटरवर संपर्क साधू शकतात.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button