मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमअंतर्गत जिल्हयातील बेरोजगार युवक युवतींना रोजगाराची सुवर्णसंधी
MH 28 News Live, बुलडाणा : ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेवुन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम शासनाने ऑगष्ट 2019 पासुन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. CMEGP योजनेस बुलडाणा जिल्हयात गेल्या तीन वर्षापासुन अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे मोठया प्रमाणात कर्ज प्रकरणे पोर्टलवर दाखल होत असुन विविध बँक शाखांचे माध्यमातुन कर्जप्रकरणांना मंजुरी मिळत आहे. सन 2022-23 साठी शासनाने बुलडाणा जिल्हयास गेल्या वर्षापेक्षा चार पट अधिक निधी उपलब्ध करुन दिल्याने एकुण 2000 युवक युवतींना वित्तीय संस्थेच्या माध्यमातुन लाभ देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
या योजनेतुन मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याने मुदतीत लक्षांक पुर्ती होण्यासाठी वर्षाचे सुरवातीपासुन प्राधान्य देण्यात येत आहे. या योजनेत लाभ घेण्यासाठी कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय 18 वर्षे पुर्ण अधिकतम मर्यादा 45 वर्ष (अनु.जाती /जमाती /महिला/अपंग/माजी सैनिक यांना पाच वर्ष शिथील आहे) शैक्षणिक पात्रता रु.10 लाखावरील प्रकल्पासाठी सातवी पास तसेच रु.25 लाखावरील प्रकल्पासाठी 10 वी पास आहे. या योजनेत सेवा उद्योग तसे च कृषी पुरक उद्योग/व्यवसायांसाठी रु.10 लाख तसेच उत्पादन प्रकारच्या प्रवर्गातील प्रकल्पांसाठी रु.50 लाखापावेतो कर्ज सुविधा उपलब्ध असुन एकुण प्रकल्प किंमतीचे शहरी भागासाठी 25 टक्के व ग्रामीण भागासाठी 35 टक्के पावेतो मोठया प्रमाणावर अनुदान उपलब्ध होणार आहे .
ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असुन आपला उद्यो ग व्यवसाय उभारणीसाठी शासनाच्या https://maha-cmegp.gov.in/homepage संकेतस्थळावर भेट देवुन आपले गांव ज्या बँक शाखेत येते त्या बँकेची निवड करुन अर्ज जवळच्या सेतु सुविधा केंद्रात जावुन अथवा मोबाईल वरुन दाखल करावा बुलडाणा जिल्हयातील प्रत्येक गांव / शहरातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा स्वत ची तसेच गावाची प्रगती साधावी.
सदर बातमीपत्र आपल्या सर्व गरजु मित्र मैत्रिणी / नातेवाईक यांना व्हॉटस ॲप / फेसबुक चे माध्यमातुन फॉरवर्ड करुन उद्योजक होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र बुलडाणा यांनी केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button