त्या वक्तव्याचा लोणार शिवसेनेच्या (ठाकरे) गटाने केला निषेध
MH 28 News Live, लोणार : महापुरुषाबद्दल द्वेषपूर्ण विधान करणारे भारतीय जनता पार्टीचे मंत्री चंद्रकांत पाटील, बेताल वक्तव्य करणारे भाजपचे आमदार राम कदम हे शिवसैनिकांना.घरात घुसून मारण्याचे धमकी देत असल्याच्या विधानाचा लोणार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष गजानन जाधव यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी निषेध केला.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक धार रोड येथे सदर वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली व त्याबाबतचे निवेदन तहसीलदार सैपन नदाफ यांना दिले. निवेदनात नमूद प्रमाणे
संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील एका संतपिठाच्या कार्यक्रमात दि. ९ डिसेंबर रोजी चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषाबाबत अत्यंत चुकीचे द्वेष पूर्ण विधान केले, “देशात शाळा सुरु केल्या कोणी कर्मविर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतीबा फुले यांनी त्यावेळी भिक मागून शाळा सुरु केल्या ” अशाप्रकारचे विधान त्यांनी त्याठिकाणी केले होते. भाजपचे काही लोक हेतुपुरस्सर आमच्या आराध्य महापुरुषाविषयी अपमानास्पद वक्तव्य करून त्यांचा अपमान करीत आहेत तसेच राम कदम यांनी शिवसैनिकांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली. भाजपाच्या लोकांमध्ये महापुरुषांच्या विषयी अपमान करण्याची स्पर्धा महाराष्ट्रात लागल्याचे वाटायला लागले आहे. चंद्रकांत पाटलावर शाई ज्याने फेकली त्यावरील गुन्हे झाले आहेत. ते गुन्हे शासनाने त्वरीत मागे घ्यावे. अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील व राम कदम यांच्या लोणार शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) वतीने जाहीर निषेध करतो महा-पुरुषांच्या अपमान करणान्यावर त्वरीत कारवाई करून चंद्रकांत पाटील यांचा मंत्री पदाचा राजीनामा व राम कदमाचा आमदारकीचा राजीनामा सरकारने घेऊन त्यांचेवर त्वरीत कारवाई करावी. त्यांच्यावर कारवाई व राजीनामा न घेतल्यास शिवसेना (उद्धव ठाकरे गट) लोणारच्या शहराच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात येईल व याची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची राहील असेही निवेदनाअंती नमूद आहे.
सदर निवेदन देतेवेळी लोणार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख गजानन जगदेवराव जाधव, शहर उपाध्यक्ष श्यामराव राऊत, शहर संघटक तानाजी मापारी, शहर उपाध्यक्ष शेख लूकमान शेख उस्मान, सुदन अंभोरे, कैलास अंभोरे, श्रीकांत मादनकर, असलम खान पठाण, संजय नेवरे, सावता सेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता राऊत, रमेश भरदम, प्रकाश जाधव, संदीप मुद्देराज, विनायक मापारी, गजानन राऊत, राम खरात, प्रवीण सरदार, सचिन काकडे, देवानंद जाधव, रमेश सरदार, अभिमन्यू मोरे, दत्ता राऊत, सत्यवान खोटे, रामदास शिंदे, गजानन आढाव, विजय लेले, संतोष चोपडे, फकीरा डेंगले, गणेश जावळे, रवी खोटे, ज्ञानेश्वर चोपडे यांच्याह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button