धार्मीक उत्सवातुन मानवी जिवनाला योग्य दिषा प्राप्ती होते – भारतीताई बोंद्रे
MH 28 News Live, चिखली : महाराष्ट्राला थोर संतांची पुण्याई लाभलेली असुन संतांची कर्मभुमी असल्याने पुर्वीपार पासुन धार्मीक, सांस्कृतीक हा ठेवा आपल्याला लाभला आहे, देवी देवता, संत महात्म्यांच्या स्पर्षाने पावनभुमीत साजरे होणारे धार्मीक यात्रा, महोत्सव, भागवत कथा, हरिनाम सप्ताह आदींच्या माध्यमातुन ईश्वराशी एकरूप होतांना मनुष्याच्या जगण्याला योग्य दिशा प्राप्ती होत असल्याचे मत हिरकणी प्रतिष्ठांच्या भारतीताई बोंद्रे यांनी केले. तालुक्यातील पाटोदा येथे श्री परमहंस सद्गुरू स्वात्मानंद महाराज यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित महाप्रसाद वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या.
चिखली तालुक्यातील धार्मीक वसा लाभलेल्या तितकेच ग्रामस्थांच्या एकजुटीचे प्रतिक असलेल्या पाटोदा या गावी सालाबादाप्रमाणे श्री परमहंस सद्गुरू स्वात्मानंद महाराज यांचा 85 वा पुण्यतिथी सोहळा या निमित्ताने भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या धार्मीक उत्सव प्रसंगी दि. 18 डिसेंबर 2022 पासुन ते 25 डिसेंबर 2022 या कालावधीत श्रीमद् संगीत भागवत कथा तथा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन गावक-यांच्या वतीने करण्यात आले होते. या भव्य यात्रा महोत्सव व भागवत कथा हरिनाम सप्ताहाची सांगता दि. 25 डिसेंबर रोजी उत्साहात झाली. यावेळी पाटोदा वासियांसह पंचक्रोशीतुन श्री सद्गुरू सात्मानंद महाराज यांच्यावर श्रध्दा असलेल्या भाविक भक्तांनी मोठया संख्येने सहभागी झाले होते. यावेळी ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या भव्य महाप्रसादाचे भारतीताई बोंद्रे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी मोठया संख्येने घेतला.
याप्रसंगी उपस्थितीत भाविक भक्तांना संबोधीत करतांना भारतीतार्ठ बोंद्रे पुढे म्हणाल्या की, हरिनाम सप्ताह धार्मीक उत्सव तथा ग्रामीण भागात होणारे यात्रा महोत्सव हे सर्वधर्म समभावचे प्रतिक असुन या उत्साहामुळे जिवनात उत्साह निर्मीती होते तर, यातुन एकोपा जोपसल्या जातो. यावेळी माजी सरपंच प्रिती किशोर सोळंकी, विद्याताई बोंद्रे, शोभाताई सोळंकी, डाॅ. सत्येंद्र भुसारी, लक्ष्मण आंभोरे, रामेश्वर भुसारी, समाधान आकाळ, स्वप्नील सोळंकी, भगवान भुसारी, एकनाथ सोळंकी, समाधान सोळंकी, संतोष सोळंकी, गजानन सोळंकी, गणेष सोळंकी, चेतन सोळंकी, सतीश सोळंकी, विठ्ठल सोळंकी, बंडु सोळंकी, भागवत सोळंकी, कुलदिप सोळंकी, विशाल सोळंकी, दत्तात्रय सोळंकी, दीपक सोळंकी, ज्ञानेश्वर सोळंकी, सागर जाधव, कैलास सोळंकी, विकास सोळंकी व हिंदूसूर्य नवयुवक मंडळाचे सर्व पदाधिकारी व गावक-यांची मोठया संख्येने उपस्थित होते. महाप्रसादाचे आयोजन रामेष्वर सखाराम सोळंकी व समाधान बळीराम सोळंकी यांच्या वतीने करण्यात आले होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button