
उदयनगर येथे स्नेहसंमेलन संपन्न
MH 28 News Live, उदयनगर : येथील शहाजीराजे माध्य.व उच्च माध्य.विद्यालय, द्वारकाबाई खेडेकर प्रा. शाळा व जिजाऊ कॉन्व्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ व जानेवारीला वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यामध्ये दि. २९ ते ३१ डिसेंबर क्रिडा स्पर्धा व साहित्यिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
संगीत खुर्ची स्पर्धेमधे वर्ग तीसरीचा विद्यार्थी कामरान खान रफीक खान याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. मुख्याध्यापक अनंता चेके व मान्येवरांच्या हस्ते सुवर्णपदक व प्रमाण पत्र देण्यात आले तर १ जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक पुरुषोत्तम खेडेकर (संस्थापक अध्यक्ष राष्ट्रमाता जिजाऊ संस्था) व माजी आमदार रेखाताई खेडेकर (सचिव राष्ट्रमाता जिजाऊ संस्था) तर प्रमुख उपस्थिती म्हणून संचालक अशोकराव देशमुख, कोषाध्यक्ष पंडितराव देशमुख, उदयनगरचे नवनिर्वाचित सरपंच मनोज लाहुडकार, केंद्रप्रमुख ठेंग हे होते. या कार्यक्रमात अनंता चेके यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, नाटिका, लावणी, वेशभूषा इत्यादी वेगवेगळे कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्मितल देशमुख, ज्ञानेश्वर अवचार, सुरेखा झिने, शैला सवडतकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर अवचार यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शहाजीराजे माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, द्वारकाबाई खेडेकर प्राथमिक शाळा, जिजाऊ बाल संस्कार केंद्र उदयनगर यांनी मोलाचे योगदान दिले.