
समाजाला दिशा देण्याच सामर्थ्य पत्रकाराच्या लेखणीत – राम डहाके
MH 28 News Live, उदयनगर : दि. ६ जानेवारी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र राज्यात पत्रकार दिन साजरा केला जातो. या पत्रकार दिनाचे औचित्य साधत काँग्रेस नेते राम डहाके यांनी उदयनगर येथील निवासस्थानी परिसरातील पत्रकार बांधवांचा सन्मान सत्कार केला. आचार्य बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आदय पत्रकार यांनी स्वातंत्र्य पूर्व काळात मराठी भाषेतील पाहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. वैचारिक क्रांतीने जनसामान्यांपर्यंत पोहचत तत्कालीन सत्ताधारी ब्रिटिशांपर्यंत जनभावना पोहचविण्यासह स्वातंत्र्य चळवळीचे विचारांची पाळंमुळं खोलवर रुजवत जनजागृतीचे महान कार्य दर्पणकारांनी केले.निस्पक्ष व निर्भीड वार्तांकन करतांना पत्रकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते देशाच्या जडणघडणीत लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारांचे मोलाचे योगदान असून अन्यायाला वाचा फोडत समाजाला दिशा देणाचे सामर्थ्य पत्रकारांच्या लेखणीत आहे असे गौरवोद्गार पत्रकार दिनानिमित्त आयोजित सन्मान सोहळ्यात काढत राम डहाके यांनी पत्रकार बांधवांचा सन्मान सत्कार करत शुभेच्छा दिल्या.
या सत्कार सोहळ्याला समाजासाठी अहोरात्र झटणारे पत्रकार सत्कारमूर्ती दैनिक देशोन्नती पत्रकार ज्ञानेश्वर वाकडे, प्रताप कौसे, लोकमतचे वसंतराव सिरसाट, सकाळचे राफीकभाई, तरुण भारतचे माधवराव धुंदळे, पुण्यनगरीचे रघुनाथ गवई, दिव्य मराठीचे जिया काझी, खोझ मास्टर न्युजचे रफिक खान यांना पुष्पहार, नोटपॅड, पेन, फाईल, दिनदर्शिका देत मिठाई भरवत सन्मान सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अक्रम खासाब, नारायण दिवटे, प्रमोद टेकाळे, नारायण उफाळे, फैजल खान, साहेब खान यांचेसह बहुसंख्य मंडळी उपस्थित होती.



