सर्वसमावेशक व प्रगतीशील अर्थसंकल्प – आ. श्वेताताई महाले यांची प्रतिक्रिया
MH 28 News Live, चिखली : अमृतकाळातील अर्थसंकल्प २०२३ – २४ हा देशातील सर्व घटकांना सामावून घेणारा प्रगतीशील अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पातून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांची दूरदृष्टी स्पष्ट होत आहे. अशी प्रतिक्रिया आ. श्वेताताई महाले यांनी व्यक्त केली आहे.
आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आ. श्वेताताई महाले यांनी माध्रमांसाठी एक पत्रक जारी केले. यामध्ये त्यांनी ” केंद्रातील मोदी सरकारने शेतकर्यांसाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली असून कापसापासून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचा प्रयत्न होणार आहे असा विश्वास व्यक्त केला. शिक्षण क्षेत्रासाठी केंद्र सरकारने १, ०४, २७३ कोटी रुपयांच्या विविध योजनांची घोषणा केली आहे.
ग्रामीण भागात कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी ॲग्रिकल्चर एक्सीलरेटर फंड स्थापन होणार आहे असेही त्या म्हणाल्या.
नव्या उद्योगांना आर्थिक मदत मिळणार आहे. स्टार्टअप उद्योगांच्या माध्यमातून रोजगार आणि लघु आणि सूक्ष्म उद्योगांना ९ हजार कोटींची क्रेडिट गॅरंटी मिळणार आहे. तसेच पायाभूत सुविधांचा विस्तार करताना शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म, ४४ कोटी ६० लाख नागरिकांना जीवन विमा, ११.७ कोटी कुटुंबांसाठी शौचालये, रेल्वेसाठी २ लाख ४० हजार कोटींची तरतूद, पंतप्रधान आवास योजनेच्या निधीमध्ये ६६ टक्क्यांनी वाढ होणार आहे.
महिलांसाठी सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेची घोषणा करण्यात आली असून दोन वर्षे मुदतीची, निश्चित परतावा देणारी ही मुदत ठेव योजना आहे.
करमुक्त उत्पन्नाची वार्षिक मर्यादा वाढवून ७ लाख रुपये करण्यात आली आहे. अशा रीतीने आरोग्य, शिक्षण, युवक, उद्योग, महिला, मध्यमवर्गियांसह सर्वच घटकांना उभारी देणारा अर्थसंकल्प म्हणून याकडे पाहता येईल अशा शब्दात आ. श्वेताताई महाले यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button