रानडुकराच्या हल्ल्यात वृध्देचा मृत्यू; शेगाव तालुक्यात घडली घटना
MH 28 News Live, शेगाव : आकोट रोडवरील उनड नाल्याजवळ रानडुकराच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना २० एप्रिलच्या दुपारी घडली. जानाबाई रामचंद्र इंगळे (६५) रा. खळवाडी पुनर्वसन कॉलनी आकोट रोड शेगाव येथील रहिवासी असून, जवळपासच्या शेतातून बकऱ्यांसाठी चारा गोळा करून त्याची विक्री करून आपला चरितार्थ चालवत होती.
गुरुवारी दुपारी चारा आणण्यासाठी वृद्ध महिला मुंदडा यांच्या शेताजवळील उनड नाल्याकडे गेली होती. त्यावेळी अचानक दोन रानडुकरांनी तिच्यावर हल्ला चढविला. जखमी अवस्थेत तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून वृद्धेला मृत घोषित केले. घटनेसंदर्भात माहिती घेतली असता महिला जागेवरच गतप्राण झाली होती, असे समजले. मृत महिलेच्या नातेवाईकांनी घटनेसंदर्भात वनविभागाला कळविल्यानंतर वनाधिकारी घटनास्थळावर पंचनामा करण्यासाठी जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button