♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ते प्रेत कोणाचे ? चिखली बस स्थानकावर आढळलेल्या अनोळखी इसमाच्या मृतदेहाबाबत पोलीस करताहेत तपास

MH 28 News Live : तीन दिवसांपूर्वी चिखली बस स्थानकावर बेवारस अवस्थेमध्ये आढळून आलेल्या ७० ते ७५ वर्षीय वृद्ध इसमाचे प्रेत नेमके प्रेताची ओळख अद्याप पटली नसून चिखली पोलीस हा मृतदेह नेमका कोणाचा आहे याबाबत कसून तपास करत आहेत. याबाबतची माहिती व छायाचित्र चिखली पोलिसांनी समाज माध्यमाद्वारे सार्वजनिक केले असून त्या आधारे मयत व्यक्तीची ओळख कुणी पटवू शकत असेल तर त्यांनी चिखली पोलिसांशी त्वरित संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत थोडक्यात माहिती अशी की पोलीस कर्मचारी मनोज यादव मुळे हे दि. १३ ऑक्टोबर रोजी त्यांची डयुटी करत असतांना सायंकाळी साडेचार वाचेच्या सुमारास चिखली आगाराचे वाहक अनंत बाबुराव सानप यांनी माहीती दिली कि बस स्थानक चिखली येथे एक वयोवृदध इसम बेशुदध अवस्थेत पडला आहे. त्यावरुन सपोनि राहुल गाँधे व फिर्यादी सरकारी वाहनाने बस स्थानक चिखली येथे जावुन पाहीले असता तेथे प्लॅट फॉर्म क्र. ८ वर प्रवाशांच्या बसण्याच्या बाकड्यावर एक अंदाजे ७० ते ७५ वयोगटातील अनोळखी इसम अंगात पांढरे रंगाचे नेहरू शर्ट व धोतर घातलेला बेशुदध अवस्थेत पडलेला दिसुन आला. सदर व्यक्तीला ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टारांनी त्यास तपासुन मृत घोषीत केले.

डॉक्टरांनी दिलेल्या रिपोर्टच्या आधारे पोलीस स्टेशन चिखली येथे दि. १६ ऑक्टोबला मर्ग क्र ५९/२३ क १७४ जाफी अन्वये दाखल आहे. सदर मयताचा रंग सावळा, केस बारीक व काळे पांढरे समोरुन टक्कल पडलेले शरीरबाधा. सडपातळ, दाढी वाढलेली काळी पांढरी, मिशी-बारीक काळी पांढरी उंची ५ फुट ५ इंच, कपडे अंगात पांढया रंगाचे नेहरु शर्ट मळकट झालेले, शर्टाचे आतुन पाढया रंगाची बंडी, धोतर पांढया रंगाचे व मळकट झालेले, हातात काळया पटयाची व पिवळया रंगाचे डायल असलेली घडयाळ घेतलेले आहे. तरी सदर मयत व्यक्तीला ओळखणाऱ्यांनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्याशी ९८५०५८८१५० अथवा सपोनि राहुल गोंधे यांच्याशी ८२०८४६६४२२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129