
तंत्रज्ञानाचा धमाका ! बजेटमध्ये येतोय स्मार्टफोनांचा फुल टू महापूर
MH 28 News Live : जून महिन्याचा शेवटचा आठवडा स्मार्टफोनप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. ओप्पो, विवो, पोको आणि सॅमसंग या नामवंत कंपन्यांचे चार धडाकेबाज स्मार्टफोन्स बाजारात येणार असून, कमी किंमतीत जास्त फीचर्सचा अनुभव देण्याचं वचन हे डिव्हाईस देत आहेत. या सर्व फोन्सची खासियत म्हणजे दमदार प्रोसेसर, मोठ्या बॅटरी, उत्कृष्ट कॅमेरे आणि बजेटला झणझणीत टक्कर देणारी किंमत.
🔹 OPPO K13x 5G
23 जून रोजी लाँच होणारा हा फोन, स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरसह, 6.72 इंचाचा FHD+ डिस्प्ले आणि 5000 mAh बॅटरीसह येण्याची शक्यता आहे. 67W फास्ट चार्जिंग आणि 64MP कॅमेऱ्यासह किंमत फक्त 12-14 हजारांच्या आसपास!
🔹 vivo T4 Lite 5G
24 जूनला सादर होणारा vivo T4 Lite एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे. मीडियाटेक 6300 प्रोसेसर, 6000mAh बॅटरी आणि ड्युअल कॅमेऱ्यासह येणारा हा फोन 10 हजारांच्या आत लाँच होण्याची शक्यता आहे.
🔹 POCO F7
हायपरफॉर्मन्स हवे असेल तर 24 जूनला लाँच होणाऱ्या POCO F7 कडे लक्ष ठेवा. स्नॅपड्रॅगन 8s Gen 4, 7550 mAh बॅटरी, 6.67-इंच AMOLED डिस्प्ले आणि ट्रिपल रिअर कॅमेऱ्यांनी सजलेला हा फोन 35 हजारांच्या आत मिळण्याची शक्यता आहे.
🔹 Samsung Galaxy M36 5G
सॅमसंगच्या चाहत्यांसाठी 27 जून हा महत्त्वाचा दिवस ठरेल. Exynos 1380 प्रोसेसर, AI-एन्हान्स्ड 50MP ट्रिपल कॅमेरा, 6000mAh बॅटरी आणि गोरिल्ला ग्लास व्हिक्टर प्लससह येणारा हा फोन 18-20 हजारांच्या बजेटमध्ये अपेक्षित आहे.
जूनचा शेवटचा आठवडा ‘बजेट’ फोन चाहत्यांसाठी टेक्नॉलॉजीचा सेलिब्रेशन वीक ठरणार आहे. जेवढे फीचर्स, तेवढाच विश्वास आणि किंमत मात्र खिशाला झण देणार नाही अशी या लाँचिंग्सची हमी. त्यामुळे कोणता फोन घ्यायचा याचा प्लॅन आत्ताच करा – कारण हे डिव्हाइस ‘लॉन्च’ होताक्षणी ‘सोल्ड आउट’ होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.