♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सुखाच्या क्षणाआधीच कोसळला दु:खाचा डोंगर; गर्भवती पत्नीला भेटायला निघालेल्या पतीचा अपघाती मृत्यू

MH 28 News Live / मेहकर : तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे घडलेल्या एका भीषण अपघातात ३० वर्षीय रुपेश दशरथ करवते या तरुणाचा मृत्यू झाला. गर्भवती पत्नीला भेटण्यासाठी डोणगाव येथून नवेगावकडे दुचाकीवरून निघालेल्या रुपेशवर नियतीने अशी निर्दयी झडप घातली की, संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले. व्हिडिओ एडिटर म्हणून काम करणारा, नुकताच संसार सुरू केलेला आणि पत्नीच्या मातृत्वाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आतुर झालेला रुपेश, २० सप्टेंबरच्या रात्री साडेनऊच्या सुमारास या प्रवासाला निघाला होता. मात्र विठ्ठलवाडी परिसरात अचानक समोर आलेल्या अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि क्षणात सर्व काही संपवले. गंभीर जखमी झालेल्या रुपेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या दुःखद बातमीने डोणगावसह परिसर शोकमग्न झाला असून, पत्नीवर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मातृत्वाच्या काळात पतीचे असे अकस्मात निधन तिच्यासाठी असह्य धक्का ठरला आहे. घटनेनंतर संबंधित वाहनचालक फरार झाला असून पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. अपघातातील दुचाकीचेही गंभीर नुकसान झाले आहे.

कुटुंबातील स्वप्ने, भविष्यातील आशा-अपेक्षा एका क्षणात चुराडल्या गेल्या आहेत. गावकऱ्यांनी या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली असून, पोलिसांनी अज्ञात वाहन आणि चालकाचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, न्याय मिळावा अशी सर्वत्र मागणी होत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129