
अजितदादा पवारांचे आवाहन; प्राचार्य निलेश गावंडेंनाच शहराची जबाबदारी द्या चिखलीची परिवर्तन सभा ठरवणार निवडणुकीचा निकाल
MH 28 News Live / चिखली : शिक्षण आणि समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर आपल्या अनुभवाचा लाभ राजकारणाच्या माध्यमातून संपूर्ण शहराला देण्याची देण्यासाठी वचनबद्ध असलेले सुसंस्कृत व उच्चविद्याविभूषित उमेदवार प्राचार्य डॉक्टर निलेश गावंडे यांच्या ररूपान राष्ट्रवादी काँग्रेस – शिवसेना महायुतीने दिले आहेत. त्यांना प्रचंड बहुमताने विजय करून शहराच्या विकासाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर द्या चिखली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी खंबीरपणे पाठीशी उभा आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले. नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत चिखली राजा टॉवर येथे दि. २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या ‘परिवर्तन सभेला’ नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. युवक, महिला, विविध समाजघटकांची उत्स्फूर्त उपस्थिती आणि घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीची रंगत चढलेली दिसली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे, विधान परिषदेचे आमदार संजय खोडके, आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एड. नाझेर काझी यांनी देखील या प्रसंगी आपले विचार व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)–शिवसेना महायुतीच्या संयुक्त आयोजनात झालेल्या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांना संपूर्ण पाठिंबा दर्शवला. ते म्हणाले, “चिखलीच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. निलेश गावंडे यांना निवडून द्या. घाबरू नका… राज्य सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.” चिखलीतील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. “जनतेची सेवा करता येत नसेल, तर राजकारणात राहण्याचा कोणालाही अधिकार नाही,” असा टोला लगावत अजितदादा पवार यांनी सध्याच्या स्थितीवर टीकाही केली.
सर्वसमावेशक विकासाचा संदेश
छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत अजितदादा म्हणाले, “महाराजांनी १८ पगड जातींना सोबत घेऊन रयतेचं राज्य उभारलं. त्याच धर्तीवर चिखलीचा विकास सर्व समाजघटकांना सोबत घेऊन करायचा आहे.” सभेला मुस्लिम, बहुजन, मराठा, ओबीसी, हिंदी भाषिक आदी समाजांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहर बदलावाचा माझा संकल्प – प्राचार्य निलेश गावंडे
या परिवर्तन सभेत आपले मनोगत व्यक्त करताना महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राचार्य डॉ. निलेश गावंडे म्हणाले, “शिक्षक म्हणून मी आजवर हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले, आता चिखली शहराचे आधुनिक आणि शाश्वत भविष्य घडवण्याचा निर्धार केला आहे. या निर्धार आला आपण मतदान आरोपी आशीर्वाद देऊन प्रत्यक्षात उतरवण्यासाठी बहुमोल सहकार्य करावे असे भावनिक आवाहन प्राचार्य निलेश गावंडे यांनी यावेळी बोलताना केले. शिक्षण, रोजगारनिर्मिती, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि स्मार्ट सेवा उपलब्ध करणे हे स्वतःच्या प्राधान्यक्रमात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सभेने बदलाच्या राजकारणाला वेग
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एड. नाझेर काझी, विधानपरिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, आ. संजय खोडके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस ओ बी सी सेल जिल्हा अध्यक्ष देव्हडे, मनोज दांडगे, कपिल खेडेकर, रोहित खेडेकर, कैलास भालेकर, विलास घोलप, तुषार बोंद्रे, इरफान अली, वसीम शेख शहर अध्यक्ष युवक राष्ट्रवादी, शिवसेना महिला जिल्हा अध्यक्ष मायाताई म्हस्के, संतोष लोखंडे व सर्व उमेदवार राष्ट्रवादी आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिवर्तन सभेमुळे महायुतीच्या प्रचाराला बळ मिळाले असून प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांच्या उमेदवारीत नवसंजीवनी आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. चिखलीतील तिऱंगी लढतीत ही सभा निर्णायक ठरल्याची प्रतिक्रिया सभेस उपस्थित असलेले नागरिक व्यक्त करत होते.



