♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बनावट दस्त तयार करून वृध्द महिलेची जमीन हडपण्याचा प्रयत्न बनावट कागदपत्रे बनवून जमीन हडपणारी टोळी सक्रिय

MH 28 News Live / जळगाव जामोद ( अमोल भगत ) : शेतीचे बनावट दस्त तयार करून ७७ वर्षीय वृद्ध महिलेची जमीन हडपण्याचा प्रयत्न हाणून पडला आहे. तालुक्यातील ग्राम रसलपुर येथील रहिवाशी विधवा निरक्षर शेतकरी महिला धृपताबाई वानखडे यांची जमीन बनावट कागदपत्रे तयार करून हडप करण्याचा प्रकार समोर आला असून संग्रामपूर तालुक्यातील अवैध सावकारी करणारा निसार मो.अल्ताफ वय ४४ वर्ष याने व त्याच्या दोन साथीदार सै. जावेद सै. बाबु रा. जळगांव जामोद व अब्दुल रहिम खान सम्मर खान रा. जळगाव जामोद यांच्या मदतीने जमीन हडपण्याचा प्रयत्न

जळगाव जामोद पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार धूपताबाई वानखडे यांनी दिनांक ९ डिसेंबर रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून तिघांवरही अप क्रमांक. ५८१/२०२५ कलम ४२०, ४६८, ४७१, ५०४, ०६, ३४ नुसार जुना दाखल करण्यात आला आहे. वृध्द महिला धूपताबाई वानखडे यांची वडशिंगी जवळील ग्राम परशरामपूर येथे गट क्रमांक ६४ मध्ये १ हेक्टर ४१ आर शेती होती. उपचारासाठी धूपताबाई यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी आपली शेती कायदेशीररित्या सुरेखा वानखडे आणि अर्चना तायडे यांना विकली मात्र अचानक धूपताबाई यांना फेरफार रद्द ची नोटीस देण्यात आली होती. कारणही तसेच होते कधी न पाहिलेल्या किंवा ओळख नसलेल्या निसार अलताफ यांच्या नावाने खोटा खरेदी दस्त तयार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. निरक्षर असल्याचा फायदा घेतल्याचे धूपताबाई यांनी तक्रारीत म्हटले आहे. वृद्ध महिलेची फसवणूक केल्याने वृद्ध महिलेने पोलीस स्टेशनला धाव घेतली होती. पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात पीएसआय नारायण सरकटे करीत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129