
खामगावात दारुच्या कारणाने वाद; तिघांवर गुन्हे दाखल
MH 28 News Live, खामगाव : दारुची शिशी का दिली म्हणून पोलिस माझ्या घरासमोर आले. या कारणावरून वाद होवून तिघांनी एका ३५ वर्षीय महिलेस लोटपाट करून शिवीगाळ केल्याची घटना १९ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता पोस्टमन कॉलनी घाटपुरी येथे घडली.
माधुरी अनंता दांडगे वय ३५ रा. पोस्टमन कॉलनी घाटपुरी या महिलेने शिवाजी नगर पोस्टेला तक्रार दिली की आज सकाळी लक्ष्मण वानखडे याने म्हटले की, ” तुम्ही पोलिसांना सांगितले की माझे मुलाजवळ दारुची शिशी का दिली म्हणून पोलिस माझ्या घरासमोर आले “, मी त्यास म्हटले की ” माझा मुलगा लहान आहे. त्याच्या जवळ दारु देऊ नका ” असे म्हटले असता शांताबाई वानखेडे हीने लोटपाट केली. तसेच पती अनंता दांडगे यांना लक्ष्मण वानखडे याने लोखंडी पाईपाने मारहाण केली तर गोलू वानखडे याने शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
शिवाजी नगर पोलिसांनी आरोपी लक्ष्मण वानखडे, गोलू वानखडे, शांताबाई वानखडे या तिघांविरुध्द कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंविचा गुन्हा दाखल केला. तर दुसऱ्या घटनेत शांताबाई लक्ष्मण वानखडे वय ४५ या महिलेने तक्रार दिली की, अनंता दांडगे हा दारु पिऊन माझ्या घरासमोर आला व ” तुम्ही दारु विकता ” असे म्हणून माझे पती लक्ष्मण वानखडे यांना शिवीगाळ केली तर माधुरी दांडगे हिने लोटपाट केली. तसेच माझे पती लक्ष्मण वानखडे यांना अनंता दांडगे याने दगडाने मारहाण केली व शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपी अनंता दांडगे याच्या विरुध्द कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ भादंविचा गुन्हा दाखल केला.