
रोजगार वार्ता – महावितरण, बुलडाणा आणि सांगली मनपा व ECGC मध्ये शेकडो जागा
MH 28 News Live, बुलडाणा : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच ‘एबीपी माझा’ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. आज आम्ही आपल्याला बुलडाणा महावितरण (Buldhana Mahavitran Job), सांगली महानगरपालिका (Sangli Mahapalika Job) तसेच एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECGC) मध्ये असलेल्या नोकरीच्या संधीविषयी माहिती देणार आहोत.
महावितरण, बुलडाणा
प्रशिक्षणार्थी पदाच्या १८३ जागांसाठी भरती निघाली आहे.
पहिली पोस्ट – इलेक्ट्रिशियन
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण
एकूण जागा – ७५
वयोमर्यादा – १८ वर्ष पूर्ण आवश्यक
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ मार्च २०२२
तपशील – www.mahatransco.in
दुसरी पोस्ट – वायरमन
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण
एकूण जागा – २७
वयोमर्यादा – १८ वर्ष पूर्ण आवश्यक
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ मार्च २०२२
तपशील – www.mahatransco.in
तिसरी पोस्ट – कोपा
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण
एकूण जागा – ३४
वयोमर्यादा – १८ वर्ष पूर्ण आवश्यक
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ मार्च २०२२
नोकरीचं ठिकाण- बुलढाणा
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
तपशील – www.mahatransco.in
सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका
पोस्ट – शिकाऊ डेटा एन्ट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता – पदवीधर, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि., MSCIT/CC
एकूण जागा – २०
नोकरीचं ठिकाण – सांगली
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ मार्च २०२२
तपशील – smkc.gov.in
एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECGC)
पोस्ट – प्रोबेशनरी ऑफिसर
शैक्षणिक पात्रता – पदवीधर
एकूण जागा – ७५
वयोमर्यादा – २१ ते ३० वर्ष
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० एप्रिल २०२२
तपशील- www.ecgc.in (या वेबसाईटवर गेल्यावर सुरुवातीलाच तुम्हाला Click here for Recruitment of Probationary Officers FY 2022-23 ही लिंक दिसेल. क्लिक करा. जाहिरात डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)