
नांदेडच्या तिघांवर चिखलीत दाखल झाला गुन्हा. चना खरेदीच्या नावाने केली धान्य व्यापारी पिता पुत्रांची फसवणूक
MH 28 News Live, चिखली : येथील अडत व्यापारी व बालाजी अँग्रो इंडस्ट्रीजचे मालक राजेंद्र बाबूलाल अग्रवाल आणि त्याचा मुलगा मयूर यांच्या कडून एकूण ३७ लाखाचा चना खरेदी करून अग्रवाल वारंवार मागणी करुनही मालाचे पैसे न देणार्या नांदेड येथील तीन धान्य व्यापार्यांवर चिखली पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी आहे की, चिखली एमआयडीसीतील बालाजी ग्रो इंडस्ट्रीजचे मालक राजेंद्र बाबुलाल अग्रवाल (५७, रा. आनंदनगर, चिखली) आणि मयूर
ट्रेडर्सचा मालक असलेला त्यांचा मुलगा मयूर अग्रवाल यांच्याकडून नांदेड येथील भुसार मालाची दलाली करणाऱ्या दिनेश मणियार याने प्रणिता देवसरकर (प्रो. प्रा. हरित सेवा ट्रेडिंग कंपनी न्यू मोंढा मार्केट यार्ड नांदेड) यांना चना चना विकत घ्यायचा आहे असे सांगून २५३ क्विंटल ६६ किलो चना (किंमत १२ लाख ६५ हजार ७२ रुपये) मागवला. माल पोहचल्यावर एक आठवडा उलटून गेला तरी पेमेंट मिळाले नाही. त्यानंतर पुन्हा मणियारने अग्रवाल यांचा मुलगा मयूर यांच्याकडूनही नांदेडचे धान्य व्यापारी श्याम तोष्णीवाल व महावीर फाडे यांना माल पहिजे असल्याचे सांगत १२ लाख ४७ हजार २९५ किमतीचा २५४ क्विंटल ५५ किलो चना मागवला. मात्र, पहिल्या सौद्याप्रमाणेच या सौद्याचे पेमेंट सुध्दा मनियारने समोरच्या पार्टीकडून पैसे आले नसल्याचे सांगत पैसे देण्याचे लांबवले. त्यानंतर पुन्हा श्याम तोष्णीवाल (प्रोप्रा सुजाता ट्रेडर्स न्यू मोंढा मार्केट यार्ड नांदेड) यांच्या नावाने २७९ क्विंटल ५५ किलो चना दिनेश मणियारमार्फत अग्रवाल यांनी पाठवला. असा एकूण ३७ लाख ९८ हजार २९७ रुपयांचा चना मणियारने सांगितलेल्या ठिकाणी पाठवूनही पैशांचा पत्ता नसल्याने अग्रवाल पिता-पूत्र हैराण झाले.
सुभाष मणियार याच्याकडे वारंवार पेमेंट मागून देखील तो टाळाटाळ करत असल्याने अग्रवाल पिता- पूत्र आणि त्यांचे बंधू अशोक अग्रवाल असे तिघेजण नांदेडला गेले. तिथे माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांशी भेटले. तिथे मणियारला बोलावून घेण्यात आले. त्याने चन्याचा माल परस्पर विकल्याचे सांगून मालाची भरपाई करून देतो असे म्हणाला. त्यानंतर त्याने १५१ क्विंटल २० किलो चना (किंमत ७ लाख ४८ हजार ४४० रुपये) परत पाठवला. त्याच दिवशी १५० क्विंटल चना (किंमत ६ लाख ९० हजार रुपये) आणखी परत पाठवला. असा एकूण १४ लाख ३८ हजार ४४० रुपयांचा चना परत आल्याने तो अग्रवाल पिता पुत्रांनी जमा करून घेतला. माल रिजेक्ट झालेला असून, खराब क्वालिटीचा असल्याचे पत्र अग्रवाल यांना प्राप्त झाले. मात्र उरलेल्या मालाचे पैसे मिळत नसल्याने अखेर अग्रवाल यांनी चिखली पोलीस ठाण्यात २३ लाख ५९ हजार ८५७ रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली.
त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी प्रणिता संतोष देवसरकार, दिनेश सुभाष मणियार, श्याम बन्सीलाल तोष्णीवाल (तिघे रा. न्यू मोंढा मार्केट नांदेड), महावीर दीपचंड फाडे (रा. मार्केट यार्ड सोलापूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button