
शेलगाव देशमुख ग्रामसेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची अविरोध निवड
MH 28 News Live, मेहकर : तालुक्यातील शेलगाव देशमुख ग्रामसेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज ८ एप्रिल रोजी अविरोध करण्यात आली आहे. अध्यक्षपदी संगीता गणेश शेवाळे यांची तर उपाध्यक्षपदी संतोष प्रल्हाद बोरकर यांची निवड करण्यात आली आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांची निवड झाल्या बद्दल मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस वसंतराव देशमुख, मेहकर पंचायत समितीचे माजी सभापती गणेश शेवाळे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश उगले, युवा सेना उप तालुका प्रमुख एकनाथ खराट, शिवसेना शाखा प्रमुख सुनील देशमुख, माजी अध्यक्ष शेख चांद, रामेश्वर कुटे, शंकर काकडे, माजी उपसरपंच देविदास झोपाटे, माधव कड्डक, संजय पोफळे, किसन म्हस्के, राजू देशमुख, सुनील जाधव, शेख नबीब,किसन लोढे ,संजय सदार , पियुष केळे, चंद्रभागाबाई आखरे आदी मान्यवर उपस्थित होते.