♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

वेगवेगळ्या उपक्रमानी झाली चैतन्य गुरुकुलमध्ये नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात

MH 28 News Live / चिखली : स्थानिक चैतन्य गुरुकुल शाळेने २० जून रोजी नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात केली. नवीनच शाळेत पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांची शिक्षणाची सुरुवात ही विद्यारंभ संस्काराने करण्यात आली , जीवनात टेक्नॉलॉजीलाही अनन्यसाधारण महत्व आहे म्हणून वर्ग तिसरी च्या विद्यार्थ्यांनी कम्प्युटरची पूजा करून आपल्या शैक्षणिक प्रवासाला सुरुवात केली आहे , चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा परिचय व्हावा या उद्देशाने संगीत कक्षात वाद्यपूजा करण्यात आली आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नवीन शैक्षणिक सत्राला सुरवात केली.

माणुसकीचा आधारस्तंभ

विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी , म्हणून आणि गरजू बांधवांना मदतीची भावना त्यांच्यात रुजावी म्हणून वर्ग ५ ते ७ च्या विद्यार्थ्यांनी परिसरातील गरजू बांधवांना माणुसकीचा आधारस्तंभ या उपक्रमा अंतर्गत घरातील जमा केलेले वापरण्यायोग्य कपडे वाटप करून आपल्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात केली. आधुनिक युगात शिक्षणाला अनन्य साधारण महत्व आहे , शिक्षणाबरोबरच जर आपण आतापासूनच वेगवेगळी मानवी मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविली तर आपले विद्यार्थी सभ्य नागरीक होतील अशी आशा आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129