
अनुकंपाधारकांची अंतिम ज्येष्ठता यादी झाली प्रसिध्द. उद्यापर्यंत घेता येईल आक्षेप आणि हरकती
MH 28 News Live, बुलडाणा : अनुकंपा तत्वावर अनुकंपाधारक उमेदवारांकडून प्राप्त अर्जाची सुधारीत अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अंतिम ज्येष्ठता यादीतील अनुकंपाधारक उमेदवारांचे ज्येष्ठतेनुसार उपलब्ध पदांनुसार व त्या त्या पदाची सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांची तात्पुरती निवड करण्यात आली आहे. सदर अनुकंपाधारक उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जिल्हा परिषद बुलडाणाचे संकेतस्थळ www.zpbuldhana. maharahtra.gov.in वर प्रसिध्द करण्यात आली आहे.
सदर निवडीबाबत ज्येष्ठता यादीतील उमेदवारांचे काही आक्षेप, हरकती असल्यास त्यांनी तात्काळ जिल्हा परिषद कार्यालयास १७ मार्च पर्यंत लेखी स्वरूपात सादर करावे. सदर निवड यादी तात्पुरती असून प्राप्त होणाऱ्या हरकती, आक्षेपांची पडताळणी नंतरच अनुकंपाधारक उमेदवारांची निवड यादी अंतिम करण्यात येईल. याबाबत सर्व अनुकंपाधारक उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.