
भविष्यवाणी… पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी घेणार सन्यास ? कोण असेल उत्तराधिकारी ?
MH 28 News Live : सातत्याने दुसर्यांदा देशात बहुमत प्राप्त करणारे नरेंद्र मोदी गेल्या आठ वर्षापासून पंतप्रधान पद यशस्वीरीत्या सांभाळत आहेत. मोदींची देशाच्या राजकारणावर असलेली पकड व जनतेच्या मनातील असलेले स्थान पाहता ते पुढील काळातही या पदावर कायम राहतील असा विश्वास राजकीय क्षेत्रातून तसेच जनतेमधून व्यक्त होत आहे. परंतु, मोदींनंतर कोण ? हा प्रश्न देखील या सोबत चर्चेला जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी राजकीय संन्यास घेणार ? व त्यांच्यानंतर या पदावर पंतप्रधानपदावर कोण येणार ? याबद्दल महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी महाराज यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय कारकिर्दीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. महामंडलेश्वरर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी केलेल्या दाव्यानुसार, ग्रह – नक्षत्रांच्या आधारे भविष्यवाणी केली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ वर्षे देशाच्या पंतप्रधानपदी कायम राहतील.
१२ वर्षे पंतप्रधान पद भूषवल्यानंतर मोदी दिल्लीच्या राजकारणातून दूर जातील असं महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरींनी म्हटले आहे. राष्ट्रवादाच्या नावाखाली मोदी स्वत: पद सोडून त्याजागी योग्य व्यक्तीकडे जबाबदारी सोपवतील आणि यातून एक आदर्श सर्वांसमोर ठेवतील व राजकीय इतिहास घडवतील, असही ते म्हणाले.
असंही ते म्हणाले.
मोदींनंतर पंतप्रधान पदाचा दावेदार म्हणून योगी आदित्यनाथ यांचे नाव त्यांनी सूचित केले आहे. उत्तर प्रदेशमधील महोबामध्ये स्वजन शिष्य संम्मेलनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरि यांनी हे भाकित केलं आहे. अर्थात त्यांची ही भविष्यवाणी कितपत खरी ठरते याचे उत्तर येणाऱ्या काळात मिळेलच.



